Lokmat Political News | पंतप्रधान मोदींना विद्यार्थ्याचा प्रश्न | मोदींचे तोडीस तोड उत्तर | Lokmat

2021-09-13 0

दिल्लीतील जवाहर नवोदय विद्यालयात ११ वी इयत्तेत शिकणाऱ्या गिरीश सिंह या विद्यार्थ्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना उद्देशून प्रश्न विचारला, “आदरणीय पंतप्रधान, मला वाटतं पुढल्या वर्षी आपली दोघांचीही परीक्षा आहे. आमची १२ वीची परीक्षा आणि तुमची लोकसभेची निवडणूक. तुमची पुढल्या वर्षीच्या परीक्षेसाठी तयारी पूर्ण झालीय का? की तुम्ही नर्व्हस आहात?”गिरीशच्या प्रश्नावर पंतप्रधान मोदींनी अत्यंत हटके उत्तर दिले. मोदी उत्तरात म्हणाले, “जर मी तुझा शिक्षक असतो, तर तुला पत्रकारिता करण्यासाठी सूचवलं असत. कारण असे फिरकी घेणारे प्रश्न विचारण्याची सवय पत्रकारांना असते.याच प्रश्नाला उत्तर देताना पुढे मोदी म्हणाले, “राजकारणा तही मी अशा सिद्धांतानुसार काम करतो की, माझ्याकडे जी ताकद आहे, सामर्थ्य आहे, वेळ आहे, ते सारं सव्वाशे कोटी जनतेसाठी अर्पण करतो. निवडणुका येतील आणि जातील असे उत्तर दिले.

आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews

Videos similaires